धाराशिव- शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर लातूर-धाराशिव-पुणे इंटरसिटी रेल्वे अखेर सुरू झाली आहे. मंगळवारी (दि.10) सकाळी धाराशिव रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झालेल्या पहिल्या रेल्वेचे शिवसेना व युवा सेनेच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच रेल्वेच्या चालकांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
धाराशिव व लातूर येथील रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पश्चिम विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये मागणी केली होती. तसेच दि. 12/03/2020 रोजी अर्थसंकल्पीय अधीवेशनामध्ये हरंगुळ-धाराशिव-पुणे इंटरसिटी सुरु करण्याची मागणी लावून धरली होती.
यावेळी रवि वाघमारे, बाळासाहेब काकडे, रवि कोरे, तुषार निंबाळकर, गजेंद्र जाधव,बंडू आदरकर, सुरेश गवळी, मनोज पडवळ, आबा पडवळ, सुमित बागल, मनोज केजकर, महेश लिमये, संकेत सूर्यवंशी, वैभव वीर, अफरोज पीरजादे, व्यंकटेश दिवाणे, गफूर शेख, साजीद सय्यद, मनोज मगर, प्रशांत सूर्यवंशी, राज निकम, महेश उपासे, मुजीब काझी, रुपेश शेटे, सतीश लोंढे, शहबाज पठाण, आसिफ शेख यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.