तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील सहशिक्षक सुशिल क्षीरसागर यांनी इत्ता चौथीच्या वर्गामध्ये पाढे पाठांतर हा अभिनव उपक्रम राबवित आहेत.
या उपक्रमात राजनंदिनी फासे व प्रतिक्षा बन यांनी 34 व 35 पाढे पाठांतर केल्यावर या विद्यार्थ्यीनीना आवश्यक असेल ते शालेय साहित्य बक्षीस म्हणून मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.जिल्हा परीषद कन्या प्रशालेतील सहशिक्षक सुशिल क्षीरसागर यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.