तेर (प्रतिनिधी) - स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत धाराशिव तालुक्यातील तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी श्री संत गोरोबा काका मंदिराजवळील दगडी घाट स्वच्छ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबाकाका मंदीरालगत दगडी घाट “स्वच्छता ही सेवा“या विशेष अभियानांतर्गत व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक साथ एक तास स्वच्छता उपक्रमात सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, विठ्ठल लामतुरे, प्रविण साळुंके, अजित कदम, नवनाथ पसारे,प्रतिक नाईकवाडी ,रामा कोळी, संजय लोमटे, गणेश फंड, किशोर काळे, गुरूनाथ बंडे, सचिन आबदारे, तानाजी बंडे, सहभागी झाले होते.