धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली  नळदुर्ग शहरातील अजित आण्णा जूनैदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची नळदुर्ग येथील मलंगभाई शेख यांच्या ऑफिसला भेट दिली तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे धाराशिव जिल्ह्यामध्ये केलेल्या कार्याचा चढता आलेख व त्यांच्या कार्य शैलीवर विश्वास ठेवत नळदुर्ग शहरातील अजित आण्णा जूनैदी यांनी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.  यावेळी माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, शफिभाई शेख मलंग शेख, तीर्थ गावचे उपसरपंच विनोद जाधव, अण्णासाहेब आलुरे, समीर मोरे, यांच्या पवन व्यवहारे, सालम चिमणे, संदीप धुमाळ ,टिपू  सुलतान शेख, नासर शेख, सैफ हफिसाब, गोटू दुधाळकर, बसु भंडारकवठे, यारा दस , बालाजी राठोडआदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.


 
Top