धाराशिव (प्रतिनिधी)-प्राध्यापक विलास शंकर पडवळ हे उपळा माकडाचा व प्राध्यापिका अनिता पाटील ह्या किनी गावच्या ह्या पती व पत्नीने दोघांनी तेरणा ज्युनिअर कॉलेज येथे आपले कार्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासारखे कार्य करून तेर, ढोकी, गोवर्धन वाडी, कावळेवाडी, तडवळा, ढोकी पंचक्रोशीत आपले दिवस व रात्र आपल्या सहकार्यांबरोबर अविरतपणे कार्य करून शेतमजूर, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या मुला व मुलींना घडवण्याचे कार्य केले. त्यामुळे आज प्राध्यापक, वकील, शिक्षक, राजकीय पुढारी, पोलीस व पोलीस अधिकारी या परिसरात निर्माण करण्याचा कारखानाच तयार झाला. त्यामुळे त्यांच्या तीस वर्षाच्या सेवेचा सत्कार करण्यासाठी संपूर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एकत्र येऊन सरांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न केला.

  याप्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, शिक्षण संचालक गणपती मोरे, आ.कैलास पाटील, कामगार नेते दत्तात्रय पाटील, राजपाल देशमुख, संग्राम देशमुख, नेहाल काझी, पद्मसिंह पतसंस्थेचे अध्यक्ष भैय्या पाटील, सागर खोत, राहुल वाकुरे, प्रवीण साठे, नवनाथ फंड, प्राध्यापक वीर, प्राध्यापक सुरू, शिपाई परमेश्वर मामा कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री सतीश शहाजी कुंभार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक प्रतिमा देऊन सन्मान केला. 


 
Top