भूम (प्रतिनिधी)- जागतिक टपाल दिनानिमित्त बार्शी येथील प्रसिद्ध संग्राहक उदय पोतदार यांच्या  पोस्ट तिकीटांचा संग्रह, विविध 41 देशांतील नाणी, भारतातील अनेक नाण्यांचा संग्रह, पोस्ट कार्ड, ऐतिहासिक चलन, अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली नाणी, पोस्टाने वेगवेगळ्या प्रसंगी प्रदर्शित केलेली तिकीटे, पोस्टकार्ड, परदेशी प्लास्टिकची चलने,काडीपेटी संग्रह, परदेशी पोस्टाची तिकीटे,स्वातंत्र्यपुर्वकालीन व स्वातंत्र्योत्तर पोस्ट तिकीटे, विविध प्रकारची भेटकार्ड,बाबा आमटे यांच्या आश्रमात तयार केलेल्या भेटवस्तू,प्रथम प्रदर्शित पाकिटे, ब्रिटिश सम्राज्ञी डायना, महात्मा गांधीपासुन अनेक महापुरुषांची तिकिटे,टाकावु वस्तुंपासुन बनवलेली शुभेच्छापत्रे अशा अनेकविध प्रकारच्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, गटनेते तात्यासाहेब अष्टेकर,ह.भ.प.सतीश कदम, मुख्याध्यापक संजीवन तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय शाळेतील मुलांसह विद्यामंदिर हायस्कूलमधील 300 मुलांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.उदय पोतदार यांनी सर्व विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहाबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली.यावेळी आष्टा येथील पोस्ट ऑफिसच्या प्रमुख श्रीमती शिंदे, हायस्कूलचे वाघमारे,सुजितकुमार जाधव उपस्थित होते.अशोक नलवडे, विठ्ठल सारुक,अनिता नाईकवाडे, विजयालक्ष्मी उपळकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.


 
Top