धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील असुविधे बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. रासप कडून देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील प्रभाग क्र. 19 मधील परिसरात मागील 20 वर्षापासून कसलीही नवीन विकासकामे करण्यात आली नाहीत. रस्ते, वीज, पाणी आदी मुलभूत समस्यांची आश्वासने देवून आजपर्यंत राजकीय पुढाऱ्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. सदरील प्रभागामध्ये नालीचे काम तसेच अंतर्गत पाईपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे वयोवृध्द, शालेय विद्यार्थी, फेरीवाले, पाणी पुरवठयाची वाहने, रुग्णवाहिका यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व कामे लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष  बालाजी वगरे, विधी  न्याय विभाग जिल्हाध्यक्ष शमशुद्दीन सय्यद ,अशोक गाडेकर, रवी कांबळे, जमीर पठाण, सलीम पठाण, राहुल जाधव, बालाजी माने, रज्जाक तांबोळी, श्रीकांत घोडके, राजेश मेटकरी आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top