तेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील सर्वांत प्राचीन विटांनी बांधलेले धाराशिव तालुक्यातील तेर येथे तिर्थकुंड आहे.धाराशिव तालुक्यातील तेर येथे तेरणा नदीपासून 50 मिटर अंतरावर तेर गावाच्या उत्तरेस तेर येथील प्रदिप व्यास यांच्या सर्व्हे नंबर मधिल शेतात 1987-88 या वर्षात पुरातत्त्व विभागाच्या वतीने उत्खनन करण्यात आले.
यावेळी याठिकाणी विटांनी बांधलेले प्राचीन तिर्थकुंड व कांहीं पुरातन वस्तू प्राप्त झाल्या होत्या.उत्खननात सापडलेले तेर येथील तिर्थकुंड महाराष्ट्र राज्यातील सर्वांत प्राचीन तिर्थकुंड असून विटांनी बांधलेले आहे.तिर्थकुंडाचे आकारमान 10 मिटर बाय 10 मिटर चौरस आकाराचे आहे.तिर्थकुंडाच्या भिंतीस खालच्या भागात 50 से.मि.रुंदिच्या अंतरावर पहीले ऑपसेट 50 से.मि.रुंदिचा तर 1 मिटर खोलीवर दुसरा ऑपसेट समान रूंदीचा आहे.यामुळे तिर्थकुंडाच्या तळाचे आकारमान 7.15 मिटर बाय 7.15 मिटर चौरस क्षेत्राचे आहे.तळाच्या भागात विटांनी फरशी तयार केली आहे.तिर्थकुंडाची खोली 2.80 मिटर एवढी असून खाली उतरण्यासाठी पूर्व व दक्षिण भागात पाय-या आहेत.पाय-याच्या भागात लहान आकाराचे छिद्र आहेत.याचा उपयोग संभवता जमिनीतील पाणी झिरपून या छिद्रावाटे तिर्थकुंडात जमा होत असावे.तिर्थकुंडाची निर्मिती इ.स.2/3 शतकात झाली असावी.सदर तिर्थकुंड महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे राज्यसरंक्षित स्मारक आहे.
तिर्थकुंडाला मिळणार गतवैभव
धाराशिव तालुक्यातील तेर येथील 2/3 शतकातील राज्यातील सर्वांत प्राचीन विटांनी बांधलेले तिर्थकुंडाची पडझड झालेली आहे.त्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पाठपुरावा करून सांस्कृतिक विभागातर्फे 5 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत.त्यामुळे पुरातन तिर्थकुंडाला गतवैभव प्राप्त होणार आहे.
(तेर येथील तीर्थकुण्ड तथा बाजूला चापाकार रचना असणार्या वास्तूचे अवशेष तत्कालीन उत्खननांत आढळून आले असून सदर अवशेष सातवाहन कालीन आहेत .लवकरच यांचे जतन संवर्धन तथा सुशोभीकरण कार्य पुर्ण करण्यात येईल–श्री .अमोल गोटे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन,संभाजीनगर)