तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलीत श्री तुळजा भवानी सैनिकी विद्यालयात दिनांक 1 आक्टोबर 2023 रोजी 1 तारीख 1 तास स्वच्छता मोहिमे अंतर्गत विद्यालय, वसतीगृह व मेस विभागाची सर्व विधार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता केली.

दिनांक 2 आक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्राचार्य वैजनाथ घोडके यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. विविध शालेय स्पर्धेतील गुणवंताचे बक्षिस देवून गुण गौरव करण्यात आला. विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सुरवसे बी.डी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. गांधी विचार संस्कार जळगाव आयोजीत महात्मा गांधीजीचे विचार बालमनावरती रुजविण्याकरीता 300 विद्यार्थ्यांना सहशिक्षक  वाडीकर सरांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य यांनी परिसराच्या साफसफाई  पेक्षाही चांगला विद्यार्थी घडण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. स्वच्छ मन असणे आवश्यक आहे. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक स्वामी यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top