तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांनी गावात प्रवेश करू नये, असा इशारा देणारे फलक  गावातील चौकात, महामार्ग रस्त्यावर झळकु लागले आहेत. तर ग्रामपंचायत, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य  मराठा समाजाला आरक्षण  मिळेपर्यत आपल्या उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाचे राजानामे सरपंचाकडे सपूर्द होवु लागले आहेत. अश्विनी पोणिमे नंतर प्रवेश बंदी करणाऱ्या गावाचा संखेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

एक मराठा लाख मराठा आरक्षण देत कसे नाही घेतल्याशिवाय राहत नाही  अशा घोषणांनी खेडे दणाणुन जात आहेत. ग्रामपंचायतींच्या वतीने ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी ठरावही होऊ लागले आहेत. समाज  अक्षरशः पेटून उठले आहेत. अनेक गावांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या आजी-माजी नेत्यांना गावात प्रवेशबंदीचे  माळुंब्रा, मसला, सांगवी काटी सह अनेक  गावात फलक झळकले आहेत. यात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बोर्ड व विविध ग्रामपंचायतीच्या वतीने मराठा समाजाला सर्व राजकीय नेत्यांना गावात बंदी ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय प्रवेश बंदी तसेच नेत्यांच्या सभा व मेळाव्यास बंदी घातली आहे. विशेष म्हणजे ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही ग्रामपंचायतींच्या ठरावामध्ये तर जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आगामी काळातील सर्व निवडणुका व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संमत केला आहे. शासनाने जर त्वरित योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढेल आणि त्यास हे नाकर्ते शासन जबाबदार असेल, असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात

आले आहे. आज पर्यत माळुंब्रा, मसला, सांगवी काटी या महामार्गावरील गावांमध्ये फलक झळकले असुन अश्विनी पोर्णिमे नंतर गावबंदी फलकात मोठ्या संख्येने वाढ होण्याची शक्यता आहे.


 
Top