तुळजापूर (प्रतिनिधी)- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बाजार समित्यांची सन 2022-23 या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात राज्यात तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गुणानुक्रमाने 39 वा क्रमांक मिळाला आहे. लातूर विभागात 6 वा क्रमांक तर जिल्हयात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हयात रँकींगमध्ये दुसरी आली आहे. राज्यातील बाजार समित्यांची तालुका व जिल्हास्तरीय समितीने पडताळणी केलेले बाजार समित्यांचे क्रमवारीचे तालुका व जिल्हा स्तरीय समितीने पडताळणी केलेल्या माहितीनुसार व गुणांकन पद्धतीनुसार प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे राज्यातील 305 बाजार समित्यांची सन 2022-23 या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीस अवघ्या 0.5 ने जिल्हयात क्रमांक एकवर येण्यासाठी वंचित राहावे लागले. ई - नाम मार्कट नसल्यामुळे एक नंबरची क्रमवारी पासुन तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला वंचित राहावे लागले. ई नाम प्रणाली नुकतीच येथे सुरु झाली आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च क्रमवारीसाठी गृहीत धरला जातो. यातील बहुतांशी काळ प्रशासकाचा होता.
ई-नाम माध्यमातून योग्य दर देणार - सभापती सचिन पाटील
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नुकताच ई-नाम मध्ये समावेश झाला असुन ई नामची प्रभावी अमंलबजावणी करुन शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सभापती सचिन पाटील यांनी दिली.