धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा मंजूर व्हावा म्हणून यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. यामध्ये  धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी पिक विमा देण्यासाठी शिफारस केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी विजयादशमी सणाच्या अगोदर शेतकरी बांधवांना अग्रीम पिक विमा द्यावा, अशी मागणी धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन धाराशिव जिल्ह्यातील 57 महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा मंजूर व्हावा यासाठी सहकार्यांसोबत येथे भेटून निवेदन दिले होते.

तसेच जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून आज जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या कार्याचा तिसरा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष  सुरेश  बिराजदार,  नवनाथ  जगताप, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे,  सुनील साळुंखे,  शमसोद्दिन जमादार आदीसह पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.


 
Top