नळदुर्ग (प्रतिनिधी)- कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती (पुरुष व महिला) स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते झाले.

यावेळी विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, अँड. प्रदीप मंटगे, भास्करराव सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते अझहर जहागिरदार, प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.चांदसाहेब कुरेशी यांच्या उपस्थिती होती.

या प्रसंगी मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले कि, महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालेला कुस्ती हा मैदानी खेळ आज राष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. या खेळात जे खेळाडू सहभागी होतात त्यांचे आरोग्य व शरीर नेहमीच निरोगी राहते. आपल्या परिसरातील खेळाडू व महाविद्यालयातील विद्यार्थांना या खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही या स्पर्धेंचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुभाष राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयाचे कुस्तीपटू त्यांचे क्रिडा शिक्षक व गावातील नागरीक उपस्थित होते.


 
Top