धाराशिव (प्रतिनिधी)- नवरात्री निमित्त रोटरी क्लब व ओस्ला ओॲसीस लेडीज फाउंडेशन धाराशिव यांच्या वतीने दि. 20 व 21 ऑक्टोबर, शुक्रवार-शनिवार 2023 रोजी समर्थ मंगल कार्यालय, धाराशिव येथे संध्याकाळी 6.00 ते रात्री 9.00 वा. पर्यंत दांडिया नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील दांडिया नाईट कार्यक्रमात ग्रुप दांडीया, दांडीया क्विन, उत्कृष्ट वेशभुषा, लकी ड्रॉ अशा अनेक माध्यमातून विविध प्रायोजकांतर्फे बक्षीसांची लयलूट असणार आहे.  महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  या कार्यक्रमात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत. तरी आयोजकांच्या वतीने सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top