धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा सरकारी रुग्णालयातही औषधांची तसेच आवश्यक कर्मचारी/डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे जिल्ह्यातील सामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यासाठी गुरुवार, दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी धाराशिव शहर काँग्रेसच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे आवश्यक कर्मचारी व डॉक्टर्स यांची तातडीने भरती करण्यात यावी. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आवश्यक औषधी पुरवठा तात्काळ करण्यात यावा. महाविद्यालय व रुग्णालय परिसरात स्वच्छता व सुरक्षिततेची यंत्रणा सुधारण्यात यावी. नांदेड येथील अधिष्ठाता यांना टॉयलेट स्वच्छ करायला लावणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या खासदार हेमंत पाटील यांना निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, उमेश राजेनिंबाळकर, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, दर्शन कोळगे, अशोक शेळके, शहाजी मुंडे,  शिलाताई उंबरे, मूहिब शेख, सरफराज काझी, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, आयुब पठाण, अभिमान पेठे, अभिषेक बागल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.

आंदोलनानंतर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून त्यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. 


 
Top