वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्रशाला इंदापूर तालुका वाशी येथे वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने किशोर किशोरी हितगुज मेळावा वंचित विकास संस्थेचे रामभाऊ लगाडे यांनी आयोजित केला होता. यामध्ये संवाद कौशल्य संभाषण कौशल्य वकृत्व कौशल्य गुणवत्ता वाढी विषयी माहिती व अंधश्रद्धा निर्मूलन विज्ञानवादी दृष्टिकोन हुंडाबळी जातीयता निर्मूलन व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले.

यानंतर मुला मुलीचे स्पर्धात्मक कार्यक्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक सतीश भायगुडे सर यांनी विजेतांना नोटबुक पेन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामभाऊ लगाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यानंतर यावेळी व्यसनमुक्तीच्या व स्वच्छता मोहिमेच्या आपलं गाव स्वच्छ करा रोगराई पासून सावध रहा अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाची प्रस्ताविक बळीराम जगताप सर यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीमंत चव्हाण, रवींद्र गायकवाड, ढेपे सारिका, सुकाळे ज्योती, कुरवलकर उमेश यांनी परिश्रम घेतले. या हितगुज मेळाव्याला शंभर ते सव्वाशे मुला मुलीने सहभाग घेतला.


 
Top