नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथे  ईद ए मिलाद शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी  उत्साहात साजरा करण्यात आला. ईद निमित्त रोषणाई व देखाव्याच्या मिरवणूक दरम्यान चावडी चौक येथे बक्षिसे देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक नुरानी मस्जिद रहिम नगर,  द्वितीय क्रमांक चिस्तीया कमिटी मुलतान गल्ली यांना राष्ट्रवादी काग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. यावेळी अकरा मंडळानी या मिरवणूकीत सहभाग नोंदवला. तत्पूर्वी सकाळी  शहरातून भव्य दुचाकी,चारचाकी रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाफेज खारी सय्यद सगीर अहमद जाहगीरदार हे होते. तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे, कमलाकर चव्हाण, मुश्ताक कुरेशी, समितीचे  अध्यक्ष आलेम मोहमद रजा, हाफेज फारूक अहमद शेख, हाफेज मुजफर शेख, हाफेज शब्बीर अहमद शेख,  शब्बीर कुरेशी, नितीन कासार, अमृत पुदाले, शरीफ शेख, सलिम शेख,  इरफान जहागीरदार, हाजी खतिब, रुकनोद्दीन शेख, अफसर जमादार, सपोनी पिराजी तायवडे, सुरज देवकर, इक्बाल शेख, इक्बाल कुरेशी आदीजन उपस्थित होते. यावेळी सर्व धर्मगुरूंचा जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरीफ  शेख यांनी केले.


 
Top