धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड अनिल काळे व लॉन टेनिस असोसिएशन चे अध्यक्ष युवराज नळे यांच्या हस्ते तर विजेत्यांना मेडल वितरण आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर व क्रीडा अधिकारी श्री नाईकवाडी यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी पंच म्हणून शुभम जकाते व राजाभाऊ कारंडे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक श्री बांगर यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मुलींत प्रियंका हंगरगेकर, संस्कृती जळकोटे, शुभांगी नलावडे, तर मुलांत प्रथमेश अमृतराव, कृष्णा थिटे, स्वराज भिसे आपापल्या वयोगटात प्रथम क्रमांकाने विजयी झाले. आभार प्रदर्शन जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे यांनी मानले.


 
Top