तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील निजाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने पुरातन अनमोल वस्तू 83 वर्षांपूर्वी तेरहून हैद्राबादला नेलेल्या आहेत परंतू अद्यापही त्या परत तेर येथे देण्यात आलेल्या नाहीत.

प्राचीन काळी धाराशिव तालुक्यातील तेर हे सातवाहन राज्याची राजधानी पैठण असली तरी आर्थिक राजधानी तेर ही होती.प्राचीन काळी या तेर शहराचा  रोम, इजिप्त ,र्ग्रीक अशा अनेक  देशाशी व्यापारी संबंध होते. ब्रिटिश.संशोधक हेन्री कझिन्स यांनी नोव्हेंबर 1901 ला धाराशिव तालुक्यातील तेर येथे भेट देऊन त्यानाच  तेरच्या पुरातत्वावर विसृत प्रकाश टाकण्याचा पहिला मान जातो.त्याचा वृतांत 1902-3 मध्ये प्रसिद्ध केला.त्यानंतर 1929-30 साली तत्कालीन निझाम सरकारच्या पुरातत्त्व विभागाने तेर येथील त्रिविक्रम मंदिराच्या जतनच्या दृष्टीने पहाणी केली.इ.स.1939-40 च्या सुमारास तत्कालीन निझाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने तेर येथील पांढरीच्या टेकाडावरच्या शेकडो प्राचीन वस्तू गोळा केल्या होत्या.परंतू त्यांची जंत्री आणि वर्णनात्मक लेख प्रसिद्ध केले नसल्यानें तेरच्या वैभवाचे यथार्थ दर्शन झाले नाहीत.यातील कांहीं वस्तू हैद्राबाद येथील शासकीय संग्रहालयात पहावयास मिळतात.भारताला स्वातंत्र्य 1947 ला मिळाले परंतु निझामाच्या ताब्यातील मराठवाड्यातील तेर हैद्राबाद मुक्ती संग्रामातनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वातंत्र्य होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाले.मराठवाडा मुक्ती संग्राम होऊन 75 वर्ष होऊन गेले तरी निजाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने तेर येथील अनमोल पुरातन वस्तू 83 वर्षांपूर्वी तेरहून हैद्राबादला नेलेल्या आहेत . त्या पुरातन वस्तू अद्यापही परत केलेल्या नाहीत.आज रोजी तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू वस्तुसंग्रहालयाची भव्य इमारत उभा रहाते आहे.याच बरोबर देश, परदेशातील अनेक पर्यटक व अभ्यासक तेर येथे भेट देऊन लागले आहेत.या अनुषंगाने तेरच्या मातीचा पुरातन ठेवा हा तेरमध्येच असायला हवा ही जनसामान्यांची भावना आहे .


 
Top