धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पसंख्यक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था धाराशिव ची  19 वी वार्षिक सरवसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर पदवीधर आमदार सतीश चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे प्राचार्य दयानंद जटणुरे, धाराशिवचे गटशिक्षण अधिकारी  असरार अहेमद सय्यद, तुळजापूर  गटशिक्षण अधिकारी श्रीमती इनामदार मॅडम, पालम चे गटशिक्षणाधिकारी श्री अहमद सय्यद ,प्रदीप मोकशे, इस्माईल शेख, बालाजी इतबारे, कल्याण बेताळे ,शिवाजी कावळे, रमेश बारस्कर ,बाळासाहेब वाघमारे होते, सुरूवातीला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजर्षी छत्रपती शाहू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

प्रस्तविक चेअरमन बशीर तांबोळी यांनी केले. सदर कार्यक्रमात पतसंस्थाचे सभासद असलेल्या व गटशिक्षण अधिकारी पदी पदोन्नती झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शागीर्द शेख, विक्रम पाचंगे, बालासाहेब चिवडे, भैरवनाथ कानडे या शिक्षकांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पतसंस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विशाल सुर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन बिलाल सौदागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संचालक मालोजी वाघमारे, बिलाल सौदागर, एलाही बागवान, रहीम तांबोळी, मुबारक पठाण, मारोती काळे, मुमताज शेख, संचालिका तबसुम्म बागबान, शहेनाज औसेकर,शहेदाबी शेख,अनिशा चव्हाण यांनी परिश्रम घेतले.


 
Top