धाराशिव (प्रतिनिधी)- आपल्याकडे दुष्काळ परिस्थिती असल्याने आपणांस सतत ऊस व पाणी टंचाई जाणवते. परंतु आपण वेळोवेळी या संकटावर मात करत आलो आहोत. ऊसामध्ये 70 टक्के पाणी उपलब्ध असते याचा विचार करता कारखान्याने ऊसातील पाण्याचा पुन:र्वापर करण्यासाठी यंञ सामुग्री बसविलेली आहे. ऊसातील 70 टक्के निघणारे पाणी हे को-जन. व डिस्टीलरी प्रकल्पासाठी वापरणेत येते अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे यांनी दिली.
धाराशिव तालुक्यातील केशेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची सन 2022-23 या आर्थीक वर्षाची 26 वी अधिमंडळाची वार्षीक सर्व साधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी कारखाना साईट, अरविनदनगर येथे उत्साहात संपन्न झाली. अरविंद गोरे यांनी सभेच्या कामकाजास सुरुवात करुन सभेपुढे मांडलेल्या सर्व ठरावास उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजुरी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद व महिला सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक ॲड. निलेश पाटील यांनी सभा संपलेचे जाहीर करुन उपस्थित सभासद, महिला सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.