तुळजापूर (प्रतिनिधी)- जालना येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर अमानुष लाठीमार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याचा घटनेचा रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी मंगरुळ ता तुळजापूर येथे ग्रामस्थांनी चौकात येवुन निषेध करुन महिला भगिनी, वृध्द यांना मारहाणीचा आदेश देणाऱ्या व करणाऱ्या संबंधित मंत्री एसपी, डीवायएसपी यांच्या वर कारवाई करण्याची मागणी केली.
मराठा आरक्षण समर्थकांही आक्रमक पवित्रा घेत असुन रविवार सकाळी येथील हनुमान मंदिरात प्रथम निषेध सभा घेण्यात आली यात राजकुमार कोरेकर, मकरंद लबडे, सोमनाथ कांबळे यांनी मार्गदर्शन केले. नंतर चौकात शासनाचा निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी मराठा समाजातील महिला, वृद्ध, मुले मोठ्या संख्येने यात
सहभागी झाली होते. यावेळी राजकुमार कोरेकर मकरंद लबडे सोमनाथ कांबळे विपीन खोपडे लक्ष्मण माळी, सौदागर जाधव, अजिंक्य सरडे, दिंगबर पवार, गफूर शेख, किरण डोंगरे, अभिजीत साठे, संतोष रोकडे, यांच्या सह अनेक जेष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.