नळदुर्ग (प्रतिनिधी)- धर्म, संस्कृती टिकुन राहावी, आपापसातील मतभेद दुर व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे देवस्थान समितीच्या वतीने आयोजीत केलेल्या रक्षाबंधन सोहळा कार्यक्रमात श्री रामभक्तांनी एकमेकांना राखी बांधुन रक्षाबंधन सोहळा साजरा केला.

नळदुर्ग येथील श्रीक्ष्रेत्र रामतीर्थ येथे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या संकल्पनेतुन व श्री रामभक्तांच्या सहकार्याने आजच्या काळात धर्म टिकला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे तसेच आपापसातील मतभेद दुर होऊन सर्वजण गुण्यागोविंदाने राहावेत यासाठी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री प्रभु रामचंद्रांना साक्षी ठेऊन रामभक्तांनी एकमेकांना राखी बांधुन खऱ्या अर्थाने राखी पौर्णिमेचा सन साजरा केला. यावेळी महिलांनी महिलांना, पुरुषांनी पुरुषांना तसेच महिलांनी पुरुषांना राखी बांधली. या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधन सोहळ्यामुळे श्री राम भक्तांमध्ये स्नेह, बंधुभाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रारंभी श्री हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर श्री रामभक्तांनी एकमेकांना राख्या बांधुन धर्म आणि संस्कृती टिकविण्याची शपथ घेतली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामभक्त सचिन डुकरे, प्रभाकर घोडके, श्रमिक पोतदार, श्रीकांत पोतदार, ॲड. धंनजय धरणे यांच्यासह सर्व रामभक्तांनी परीश्रम घेतले. या रक्षाबंधन सोहळा कार्यक्रमात महिलांची संख्या उल्लेखनीय होती.


 
Top