परंडा (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी तेथे सकल मराठा समाज बांधवांनी सुरू केलेल्या आंदोलन कर्त्यांवर राज्य सरकारच्या आदेशाने स्थानिक पोलीस प्रशासनाने बेछूट पणे व निर्दयी लाठी चार्ज करून आंदोलन चिरडवण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ परंडा शहर कडकडीत बंद पाळून सकल मराठा व बहुजन बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास परांडा-भूम- वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भैया मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन तीव्र स्वरूपात या राज्यातील भाजप व त्यांना मदत करणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात सकल माराठा भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.