तुळजापूर (प्रतिनिधी)- अंतरवाली सराठी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आलेल्या मराठा बांधवावर झालेल्या लाठी हल्ला व हवेत गोळीबार करणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याचा मागणीचे निवेदन स्वराज्य संघटनेने दिले.

अंतरवाली सराटी जिल्हा जालना या ठिकाणी मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने बाळाचा वापर करून त्या ठिकाणी लाठीचार्ज हवेत गोळीबार करून त्या ठिकाणच्या लहान मुलं महिलांवर लाठीचार करत मराठा समाजाचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असून याचा स्वराज्य पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध  जालना जिल्ह्याच्या एसपींना तात्काळ निलंबित करून  मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा  राज्यभर आपल्या सरकारचा निषेध करत स्वराज्य पक्ष मोठे जन आंदोलन करेल असा इषारा निवेदनात दिला. हे निवेदन जिल्हाध्यक्ष महेश गवळी, जीवनराजे इंगळे, आबासाहेब कापसे, रोहन राऊत. कुमार टोलेश, औदुंबर जगदाळे, शिवा उंबरे, सिध्दांत रोकडे, ओंकार टोले, दिपक देशमुख, अक्षय साळवे, अण्णासाहेब अमृतराव, अविनाश पवार, शुभम पुजारी, अतुल टोले, विपीन शिंदे, दिनेश धनके, भारत जाधव,अदिंच्या स्वाक्षरी आहेत


 
Top