वाशी (प्रतिनिधी)-दिनांक 12 सप्टेंबर रोजी इंदापूर बोरी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग 52 येथे वाशी तालुक्यातील इंदापूर, खानापूर बोरी, तेरखेडा, गोजवाडा, पारडी येथील सकल मराठा समाज बांधवांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या 14 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा बांधवांनी सकाळी दहा ते साडेअकरा वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन शांततेत केले.
यावेळी वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा आंदोलकांनी देऊन परिसर दणाणून सोडला नंतर वाशी तहसीलचे तहसीलदार नरसिंग जाधव यांना आरक्षणाच्या मागणीचे व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्याचे निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला यावेळी राजेंद्र गपाट, संजय पारडे, अमर शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी वाशी पोलीस प्रशासना कडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने साहेब, पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण, कॉन्स्टेबल यादव, कॉन्स्टेबल तांबडे, यांच्यासह पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते आंदोलक ही संख्येने उपस्थित होते.