वाशी (प्रतिनिधी)- वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक सचिन छबिले यांना शिक्षक दिनानिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी या संस्थेचा कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे प्रदान करण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार जयंत आसगांवकर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे व शिक्षक आमदार जयंत आसगांवकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.बी.वाय.यादव हे होते. संस्थेचे सचिव पी.टी.पाटील, सहसचिव  ए.पी.देबडवार, खजिनदार जे.सी.शितोळे, सी.एस.मोरे,व्ही.एस.पाटील,एस.के.मोरे, बी.के.भालके, डॉ.आर.व्ही.जगताप व प्राचार्या के.डी.धावणे उपस्थित होते.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, शालेय समितीचे चेअरमन  सुरेशबप्पा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिवशंकर चौधरी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. गाढवे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक सचिन छबिले यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top