धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ व सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आळणी फाटा येथे दि. 12 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, आरक्षण देताना वंशावळची अट रद्द करावी, आरक्षण आंदोलनात मराठा तरूणावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, मराठा हे कुणबी असल्याने मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे, जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या तत्काळ मान्य करून त्यांच्या जीवाचा धोका टाळावा या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जगदीश बळीराम शिंदे, कैलास विठ्ठल सिनगारे, सुनिल गरड यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top