तुळजापूर  (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे वाड्'मय मंडळाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ हरिदास फेरे, वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी यांनी वरील प्रतिपादन केले. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वाड्'मय मंडळ स्थापन करण्यात आले असून या मंडळाचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. फेरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

यावेळी ते म्हणाले की, साहित्यामध्ये समाजाचे फक्त प्रतिबिंबच नव्हे तर परिवर्तन देखील दिसून येते,समाजाची एकवाक्यता, समाजातील संघर्ष किंवा आदराची भावना साहित्यिक उतरवत असतात, तरुणांनी स्वत:च एक आदर्श निर्माण करावा लागेल म्हणजे साहित्य आणि समाज तरुणांची किंवा त्यांच्या विचारांची दखल घेईल, समाजातील समुहाची सामुहिक भावना ही सकारात्मक असेलच असे नाही,अशा वेळी या प्रवाहा विरुद्ध जाऊन देखील आपल्याला पाऊले उचलणे गरजेचे आहे,आई वडीलांचे दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर  जीवनाचे ध्येय निश्चित होईल  तरुणांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षीय समापनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर हे म्हणाले की,व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होऊ शकत नाही,कारण साहित्यातील पात्र आपणांस हेच शिकवण देत असतात, आपणांस मृत्युंजय कांदबरीतील कर्ण प्रभावित करतो कारण तो कर्तव्यापासून परावृत्त होत नाही, त्यामुळे नेहमी आपणांस असे पात्र उर्जा प्रदान करत असतात असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले.मेजर डॉ वाय ए डोके यांनी यावेळी कम्युनिकेटीव्ह इंग्लिश या अल्पावधी प्रमाणपत्र कोर्स विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन प्रा कळसे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ आर बी रोकडे यांनी मानले.सदर प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top