तेर (प्रतिनिधी )धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धेस जिल्हाभरातील खेळाडूंचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव, जिल्हा वुशु असोसिएशन व महाराष्ट्र संत विद्यालय तेर यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात जिल्हास्तर शालेय वुशु क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेत जिल्हाभरातील खेळाडूंनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता .प्रारंभी स्पर्धेचे उद्घाघाट महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के .बेदरे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आनंद घाडगे व शालेय समिती उपाध्यक्ष एजाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यांवेळी तांत्रिक कमिटीचे प्रमुख वुशु असोसिएशनचे जिल्हा सचिव आनंद शिंदे, पंच अविनाश वाघ, प्रशिक्षक मनोज पंतगे, अमोल कदम, संतोष शिंदे, पांडुरंग ठोसर, साईराज माने, आदिंसह खेळाडू मार्गदर्शक क्रीडा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्ररसंचलन बी. डी. कांबळे व आभार प्रदर्शन एस. एस .बळवंतराव यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक अजिंक्य वराळे , करण कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.