धाराशिव (प्रतिनिधी)-येथील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा धाराशिव यांच्या वतीने रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे बुके देऊन स्वागत बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले. धाराशिव शहरातील मुख्य शाखा असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना पुष्पगुच्छ व पेन भेट देऊन सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेचे व्यवस्था महेंद्र कुमार, वरिष्ठ व्यवस्थापक किशोर कुमार, वरिष्ठ व्यवस्थापक दीपक अधटराव आणि केदार वरुणे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ.केशव क्षीरसागर आणि प्रा. श्रीराम नागरगोजे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


 
Top