उमरगा (प्रतिनिधी)- ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामाजिक संस्था, उमरगा आयोजित शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळा शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे संपन्न झाला.
यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक गणेश शिंदे यांनी पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षक व पालकांनी आपल्या मुलांमध्ये व्यावसायिक कौशल्य निर्माण करावे. यासाठी मुलांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोचविण्याची गरज आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ज्ञानदान करावे असे आवाहन केले. संयोजक आमदार ज्ञानराज चौगुले, माजी सभापती जितेंद्र शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या सोहळ्यात उमरगा व लोहारा तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील 63 शिक्षकांचा शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देवून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक गणेश शिंदे संवाद तज्ञ पुणे, उद्घाटक जितेंद्र शिंदे, संयोजक आमदार ज्ञानराज चौगुले, प्रमुख पाहुणे किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, लोहारा गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद, उमरगा शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, ज्ञानज्योतीचे उपाध्यक्ष विजयकुमार वडदरे, सचिव प्रदीप मदने यांच्यासह शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.