उमरगा (प्रतिनिधी)-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पवनचक्की कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी, (दि 11) शेतकऱ्यांनी उमरगा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आह की, सिमेंस गमेगा कंपणीकडून शासनाला खोटी माहिती देवून फसवणूक केली आहे. कंपनीने करारपत्रात 2017 च्या शासन निर्णयाचे उल्लंघन केले आहे. सदरचे करारपत्र रद्द करून शेतकऱ्यांच्या जमीनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे. कंपनीककडून प्रकल्प उभारताना शेतातील फळ झाडाचे नुकसान करून जमीनीचा रस्त्यासाठी वापर केला आहे. त्याचा मोबदला देण्यात आला नाही. कंपनीकडून काही शेतकऱ्यांच्या शेतात करारपत्र न करता किंवा परवानगी न घेता केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे. शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले चोरीचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. शेतात उभारलेल्या खांबाचा 2022 च्या शासन निर्णयाप्रमाणे जोपर्यंत मावेजा मिळत नाही तोपर्यंत उभारलेल्या संबंधित खांबावरील विज पुरवठा बंद ठेवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपोषणात सामाजिक कार्यकर्ते महेश गोरे, बालाजी मुळे, महेश सुतार, राजाभाऊ मुळे, नितीन मुळे आदिसह हिप्परगा रवा, उंडरगाव, मोघा बुद्रुक, वाडी वडगाव गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान या उपोषणाला फकिरा ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा दिला आहे.


 
Top