नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील वैभव पाटील यांनी आपल्या घरातील गणपतीसमोर अतीशय सुंदर असा चांद्रयानाचा देखावा साकारला आहे.

वैभव पाटील हे नळदुर्ग शहरांतील व्यावसायिक आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात वैभव पाटील हे नवनवीन विषयांवर आपल्या घरातील गणपतीसमोर देखावा सादर करून नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा एक चांगला प्रयत्न करतात.

नुकतेच यावर्षी भारताने चांद्रयान तीनचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे इतकेच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चांद्रयान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.भारतासाठी हा अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. या ऐतिहासिक मोहिमेच्या स्मृती जागविणारा देखावा वैभव पाटील यांनी आपल्या घरातील गणपती समोर सादर केला आहे. पीव्हीसी पाईप, टिश्यु पेपर व कापसाचा वापर करून अतीशय सुंदर असा हा चांद्रयानाचा देखावा सादर करण्यात आला आहे.


 
Top