नळदुर्ग (प्रतिनिधी)-नळदुर्ग शहरात नगरपालिकेच्या वतीने शहराचा सर्वांगीण विकास व्हावा याकरीता 7 कोटी 30 लाख रुपये खर्च करून शहरातील विविध भागांमध्ये सिमेंट-काँक्रीट रस्ते, गटारी, सभागृह, संरक्षक भिंतीचे बांधकाम, ओपन स्पेस विकसित करणे, व्यायाम शाळा, गार्डन विकसित करणे यासह विविध फंडातुन 32 कामे करण्यात येत आहेत.

यापैकी चावडी चौक ते राष्ट्रीय महामार्गा पर्यंत 30 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या सिमेंट  रस्त्याची तसेच इंदिरानगर येथे 33 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली. याठिकाणी झालेले काम समाधानकारक आहे तरीही अधिक दर्जेदार कामे करून घेण्याच्या सुचना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नगर परिषदेचे नगर अभियंता वैभव चिंचोले यांना केली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, उदय जगदाळे, माजी नगरसेवक संजय बताले, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, विशाल डुकरे, बबन चौधरी, सागर हजारे, अबुअलहसन रजवी यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


 
Top