तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील गोंधळवाळी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज दि 25 सप्टेंबर रोजी गावामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ,गोंधळवाडी व सह्याद्री ब्लड बँक धाराशिव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच गावातील विविध ठिकाणी 200 वृक्षांची वृक्ष लागवड करण्यात आली. 

शाळेत मंडळातर्फे मागील चार-पाच दिवसात भाषण, चित्रकला, निबंध, सुंदर हस्ताक्षर, प्रश्नमंजुषा तसेच क्रीडा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सचिन शेंडगे (अध्यक्ष धनगर समाज धाराशिव) महेश देवकते, बालाजी होगले, बालाजी तेरकर,उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी, सार्वजनिक गणेश मंडळ संस्थापक अध्यक्ष, संजय मोटे, उपाध्यक्ष व तंटामुक्ती अध्यक्ष, उमेश मोटे अध्यक्ष,चेतन मोटे उपाध्यक्ष, आकाश शिरगिरे, सचिव, शंकर मोटे खजिनदार, रोहन माने,सदस्य वैभव मोटे,गावचे सरपंच गोपाळ मोटे, उपसरपंच रुक्मिणीबाई मोटे,माजी सरपंच राजाभाऊ मोटे, खंबीर नेतृत्व पोपट अण्णा मोटे, तसेच नामदेव सातपुते, प्रमोद खांडेकर, शा.व्य.स.अध्यक्ष गुलचंद माने,बाळू खांडेकर, जिवलग प्रतिष्ठान अध्यक्ष बळीराम मोटे, माजी फौजी युवराज मोटे, तसेच शाळेतील मु.अ.तसेच सर्व शिक्षक वृंद.त्याचबरोबर तामलवाडी पोलीस स्टेशन निरीक्षक,चव्हाण, शिरसट उपस्थित होते.


 
Top