तेर (प्रतिनिधी)-अविरत व निरंतर शिक्षणानेच जीवनात यशप्राप्ती होते असे प्रतिपादन ह.भ.प. नंदकुमार खोत यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील प्रथम झालेली डॉक्टर शुभांगी सुधाकर चव्हाण तसेच इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी राजगुरू मळगे आणि राजनंदिनी साठे व इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी मुक्ता चव्हाण यांचा विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नवनाथ पांचाळ, सुधाकर चव्हाण, उत्तम महाराज चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वरी पांचाळ होत्या. सूत्रसंचालन संतोष भोसले यांनी केले. यावेळी उपसरपंच महेश चव्हाण, माजी सरपंच अंगद चव्हाण, सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाडुळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग आंधळे, जिल्हा परिषदच्या सहशिक्षिका शारदा जगताप, राजाभाऊ पाडूळे, रितेष चव्हाण, शरद चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.