परंडा (प्रतिनिधी)- परंडा भूम वाशी तालुक्याचे लोकनेते माजी आमदार राहुल मोटे यांनी तालुक्यातील जवळा (निजाम) येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर जवळा येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे जवळा सर्कलच्या शेतकऱ्यांसोबत सध्याचा दुष्काळ,मागच्या वर्षीचा पिकवीमा, चालू वर्षीचा पीक विमा व अग्रीम पीक विमा, कांदा अनुदान अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना फोन वर सूचना देऊन सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे असे सांगितले. यावेळी जवळा सर्कल येथील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच काल मोटे यांनी तिन्ही तालुक्यातील मतदार संघात दिवसभर कार्यकर्त्यांच्या विविध कार्यक्रमात हजेरी लावली. 


 
Top