धाराशिव (प्रतिनिधी)- समग्र शिक्षण महाराष्ट्र शासन व प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माझी ई- शाळा प्रकल्प अंतर्गत कळंब तालुक्यातील 50 शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण कळंब येथील गटशिक्षण कार्यालयातील सभागृहात पार पडले. 

सदर प्रशिक्षणात माझी ई शाळा कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, डिजिटल संसाधने आणि त्यांचा वापर यामधील दरी कमी करणे, पारंपारिक शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाची जोड देऊन अध्ययन अध्यापनासाठी हायब्रीड अध्ययन पद्धतीचा वापर करून पारंपारिक अध्यापन पद्धतीला पूरक बनवणे, व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील प्रगतीचा स्तर उंचावण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी श्री काळमाते, केंद्रप्रमुख गामोड सर, साधन व्यक्ती नकाते, चौरे  उपस्थित होते. कळंब  तालुक्यातील शिक्षकांना जिल्हा समन्वयक काजल फुलजले, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर डिगे, मनोज देवकते, दयानंद गायकवाड, मनोज राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.

धाराशिव जिल्ह्यात आठ तालुक्यात माझी ई शाळा कार्यक्रम हा दोन मोड मध्येमध्ये राबवला जात आहे. चार तालुके डायरेक्ट मोड-उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि लाईट मोडमध्ये कळंब, वाशी, भूम, परांडा येथे कार्यक्रम राबविला जाणार आहे असे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर डिगे यांनी सांगितले.


 
Top