धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्याना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक भेटावे या उद्देशाने आणि काँक्रिट दिवसाचे औचित्य साधून अल्ट्राटेक सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड च्या संयुक्त विद्यमानाने एक्सपर्ट टॉक चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने  रिसेंट  मनीफेसस्टेशन ऑफ काँक्रीट 

म्हणजेच काँक्रीटचे अलीकडील प्रकटीकरण या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे इंजि. शितलराज सिंदखेडे यांनी काँक्रिट आणि काँक्रिट चा वापर रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत कसा उपयोगी आहे आणि याचे भावी जीवनामध्ये काय गरज आहे या विषयावर मार्गदर्शन केले. 

त्याचबरोबर जी 20 या उपक्रमांतर्गत आपल्या भारत देशात सिव्हिल इंजिनिअरला आगामी स्थापत्य निर्मिती बाबत लागणारे नवीन बदल त्यामुळे  उपलब्ध होणाऱ्या नवीन रोजगाराच्या संधी या बाबत ही मार्गदर्शन केले. या निमित्त तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, इंजि. राजेशजी कांबळे, अभिषेक वेदपाठक,स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. शितल पवार, सर्व प्राध्यापक वर्ग आणि विध्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने  विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्थापत्य अभियांत्रिकी ही एक देशाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची शाखा असून या क्षेत्रामध्ये नवनवीन क्रांती घडत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे.स्थापत्य अभियांत्रिकी आणि संगणकीय क्षेत्र या दोन्हीचा ताळमेळ घालून अत्याधुनिक पद्धतीने या क्षेत्रात काय करता येईल , कसा उपयोग करून घेता येईल या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राम खोकले यांनी केले. तसेच वृक्ष रोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. काँक्रेट दिनानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण ही करण्यात आले.


 
Top