धाराशिव (प्रतिनिधी)- डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे 14 व 16 वर्ष व नाशिक येथे 18 व 20 वर्षाखालील मुले/मुली येथे होत असलेल्या ज्युनिअर गट राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्याचा संघ जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत जगताप, सचिव योगेश थोरबोले व तांत्रिक समिती प्रमुख संजय कोथळीकर,अजिंक्य वराळे यांनी जाहीर केला आहे.

धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे 10 व 11 सप्टेंबर 2023 दरम्यान झालेल्या जिल्हास्तर ज्युनिअर गट ऍथलेटिक्स स्पर्धा व निवडचाचणीतून हा संघ जाहीर केला आहे.

उस्मानाबाद जिल्हा संघात साई करंडे,अक्षरा आष्टेकर-किड्स भाला फेक,60 मी -शाहनवाज शेख, गणेश गवाड,साक्षी भोसले,100मी -सचिन पवार ,सानिका पोतदार,300मी-धीरज रायबान वासुदेव, 800 मी स्पंदन पाटील, पाडुळे दीक्षा 1500 मी विराज जाधवर,जोत्स्ना लईतबार,100 मी हर्डल्स प्रणिता जाधवर, 3000 मी समीर शेख, गोळा फेक- नाईकवाडी श्वेता, ऋतुजा क्षीरसागर आदींचा समावेश आहे. जिल्हा संघाचे प्रशिक्षक- सचिन पाटील, रोहित सुरवसे, माऊली भुतेकर, सुरज ढेरे आदींचा समावेश आहे


 
Top