परंडा (प्रतिनिधी)- सोमवार दि.11 रोजी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील विठ्ठल मंदीर, कुराड गल्ली येथे नाभिक समाजाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन नाभिक संघटनेचे नागेश डाके, व्हाईस आफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी 12 वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रितम डाके,नागेश यादव,बंडु डाके,कृष्णा काशीद,संतोष भालेकर,सुयोग यादव,सदाशिव डाके,सुरज काळे,सौरभ डाके,संतोष काशीद,मयुर काशीद, सचिन भालेकर, संदीप जमदाडे, दादा डाके,गणेश डाके, दत्ता डाके, सचिन भालेकर, ओंकार डाके, गौरव वाघमारे, संजय डाके, संतोष डाके आदिसह नाभिक समाज बांधव, महिलांची उपस्थिती होती.