नळदुर्ग (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.17 सप्टेंबर रोजी नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्तीदिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी ऐतिहासिक अलियाबाद पुलाचे पुजन करण्याबरोबरच विविध शैक्षणिक संस्था, जि. प.शाळा, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालय व नगरपालिका कार्यालय, पोलिस ठाणे, महामार्ग पोलिस, हुतात्मा स्मारक, चावडी इमारत, शास्त्री चौक येथे राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर सकाळी 9.45 वा. पार पडला.त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त नगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मारकासह हुतात्मा स्तंभाला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.
मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. दि.17 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, जि. प.शाळा, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. त्याचबरोबर नगरपालिकेत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यावेळी न.प.चे सर्व कर्मचारी व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. हुतात्मा स्मारकात तलाठी विलास वायचळ यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. चावडी चौकात मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.
राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 9.45 वा. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर पार पडला. याठिकाणी अप्पर तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या हस्ते राष्ट्रीग ध्वज फडकविण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नय्यर जहागिरदार, नितीन कासार, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,संजय बताले, बसवराज धरणे, विनायक अहंकारी,सुधीर हजारे, किशोर नळदुर्गकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहर प्रमुख संतोष पुदाले,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, संजय विठ्ठल जाधव यांच्यासह पुरातन विभागाचे कर्मचारी नागनाथ गवळी,युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
––
मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबद पुलाचे पुजन करून पुलाला अभिवादन करण्यात आले. गेल्या 25 वर्षांपासुन माजी नगरसेवक विनायक अहंकारी हे या ऐतिहासिक अलियाबाद पुलाच्या पुजनाचा कार्यक्रम आयोजित करतात याही वर्षी त्यांनी या पुलाच्या पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार व नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रफीक पटेल यांच्या हस्ते शहीद जवान बचित्तर सिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर ऐतिहासिक अलियाबाद पुलाचे उपस्थित नागरीकांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी प्रथमच अलियाबाद पुल पुजनाच्या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.