धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चा परिक्षा निकाल घोषित झाला असून “प्राचीन भारतीय इतिहास, कला आणि पुरातत्व शास्त्र“ शाखेत युवराज नळे हे 8.36 सी.जी.पी.ए. गुणांसह 'ए' ग्रेड मिळवून विद्यापीठात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ गौतम  कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास कला आणि पुरातत्व शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ माया पाटील, डॉ प्रभाकर कोळेकर, डॉ ज्ञानेश्वरी हजारे, डॉ सदाशिव देवकर, प्रा ज्ञानेश झरकर यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top