धाराशिव (प्रतिनिधी)- दर महिन्याच्या एक तारखेला आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांचे मानधन जमा करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. सोमवारी (दि.11) याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. अनाथ आणि हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबातील आपत्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील  35 आश्रम शाळेतील सुमारे 4 हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर होत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी सतीश कुंभार यांनी मुख्यमंर्त्यांना निवेदन दिले आहे.

विविध पतसंस्थांचे कर्ज, एलआयसीची हप्ते भरणे कठीण झाल्याची व्यथा मांडली आहे. त्यामुळे पगार वेळेवर करा अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या 35 आश्रम शाळा कार्यरत आहेत याठिकाणी जिल्हा परिसरातील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेतात ऊसतोड मजूर स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबातील हे विद्यार्थी असतात त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था ही आश्रम शाळा करते येथे निवासी राहून शिक्षक अध्यापन करतात मात्र पगार वेळेवर होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध संघठनानी जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्याची एक प्रत जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आली. 


 
Top