धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या पुतळा अनावरण समारंभारा नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपस्थित प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर व हास्य जत्रा फेम समीर चौगुले यांचा जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने तुळजाभवानी प्रतिमा श्रीफळ प्रसाद कुंकु देऊन सत्कार संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख शेषनाथ वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, सदस्य अक्षय भन्साळी, सत्यहरी वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. 

बाकी सहकलाकारांचा तुळजाभवानीच्या दर्शनानंतर महंत वाकोजी बुवा व पुजारी  धनंजय मस्के यांचे हस्ते गायिका कविता राम, आर जे आदित्य काकडे , हास्य जत्रा फेम अभिनेत्री चेतना भट, संगीतकार किरण वेल्हे, संगीत अभियंता अजय कातकर, देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.


 
Top