वाशी (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद शाळा शिवशक्ती नगर येथे मोठ्या थाटात आजी आजोबा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुभाष जोशी (आजोबा ) व प्रमुख पाहुणे रामभाऊ लगाडे जाणीव संघटना जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन  कोरे सर यांनी केले व प्रास्ताविक श्रीमती देवळे मॅडम मुख्याध्यापक यांनी केले. यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. 

यावेळी संगीत खुर्ची, थ्रो बॉल, आजी-आजोबा औक्षग स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन श्रीमती अंधारे, रामभाऊ लगाडे यांनी केले. सर्व आजी-आजोबांनी नातवंडाला चांगले संस्कार देऊन त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे व नातूला चांगला माणूस बनवावा यानंतर तालुका आदर्श शिक्षक म्हणून उंदरे सर यांची निवड झाल्यामुळे शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्रीमती निर्मला यादव यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वीसाठी शालेय समिती व्यवस्थापक अध्यक्ष धनश्री चेडे, उंदरे सर, जानगेवाड, श्रीमती वाकडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. यावेळी आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top