वाशी (प्रतिनिधी)- शहरात 10 आणि 11 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान भव: महाआरोग्य शिबिरात (दुपारपर्यंत) सुमारे 15,000 पेक्षा जास्त  नागरिकांनी सहभाग नोंदविला व आरोग्य सेवांचा लाभ घेतला असून या सर्व नागरिकांच्या विविध तपासण्या या शिबिरात पार पडल्या. तपासण्यांच्या आधारे सर्व नागरिकांना पुढील वैद्यकीय सल्ला देण्याचे काम संबंधित तज्ञ डॉक्टर वर्गाने केले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी, डॉक्टर वर्ग, प्रशासन, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले. याचबरोबर आरोग्य खात्यातील आशा स्वयंसेविका ताई यांच्या गटाने अतिशय मोलाचे योगदान दिल्याने त्यांचे विशेष कौतुक आरोग्य मंत्री तानाजी सावन्त यांनी केले. या शिबिरात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली.

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा नागरिकांना फायदा होत असून यापुढील काळातही अशी शिबिरे विविध ठिकाणी आयोजित करण्याचा आरोग्य खात्याचा मानस असल्याचे डॉ तानाजी सावन्त यांनी सांगितले .यावेळी जिल्हाधिकारी, आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top