नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त सुरू असलेल्या श्रावण मास पुराण पोथीची दि.11 सप्टेंबर रोजी समाप्ती झाली यावेळी सकाळी 9 वा. श्री शिवलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये शहरांतुन कळस मिरवणुक काढण्यात आली. या कळस मिरवणुकीमध्ये लिंगायत समाजाच्या शेकडो महिला सहभागी झाले होते.

पवित्र श्रावण महिन्यानिमित्त नळदुर्ग येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात गेल्या एक महिन्यांपासुन श्रावण मास पुराण पोथी सुरू होती. या श्रावण मास पुराण पोथीची समाप्ती दि.11 सप्टेंबर रोजी करण्यात आली. गेले महिनाभर याठिकाणी दररोज सायंकाळी पाच वाजता ही पोथीचे वाचन केले जात होते.

दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री शिवलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री ष.ब्रा. बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कळस मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शेकडो लिंगायत समाजाच्या महिला डोक्यावर कळस घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते.यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे,महालिंग स्वामी, मल्लिनाथ माळगे, खंडेशा कोरे, सुभाष कोरे, दिनेश बाळुरकर,बंडप्पा कसेकर, ज्योती बचाटे, महेश पाटील यांच्यासह यांच्यासह लिंगायत समाज बांधव मोठ्या सहभागी झाला होता.


 
Top