नळदुर्ग (प्रतिनिधी)- सर्व-धर्म-समभाव हा संकल्प डोळ्यासमोर ठेऊन सोलापुर येथील उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारी युनिटी मल्टिकॉन्स कंपनी गेल्या बारा वर्षापासुन आपल्या कार्यालयात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांच्या संकल्पेतुन हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
युनिटी मल्टिकॉन्स कंपनी ही व्यवसाय क्षेत्रांतील एक नामांकीत कंपनी आहे. ही कंपनी सामाजिक कार्यातही तितकीच अग्रेसर आहे. जात, धर्म, पंथ न मानता फक्त मानवता धर्म यासाठी ही कंपनी काम करते. गेल्या बारा वर्षापासुन युनिटी मल्टिकॉन्स कंपनी सोलापुर येथील आपल्या कार्यालयात गणेशोत्सव साजरा करीत आहे. गणेशोत्सव कालावधीत सोलापुर व परीसरातील राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रांतील अनेक मान्यवर याठीकाणी येऊन गणेशाचे दर्शन घेतात. युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी, संचालक जयधवल करकमकर आणि संचालिका वैशाली जैन हे स्वता दररोज पुजेसाठी उपस्थित असतात.दि.19 सप्टेंबर रोजी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील जनसंपर्क अधिकारी व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी या गणेशाचे दर्शन घेतले आहे.